Navneet Rana कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार? रवी राणा म्हणाले...

Navneet Rana कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार? रवी राणा म्हणाले…

| Updated on: Aug 31, 2023 | 4:55 PM

VIDEO | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमरावतीचे खासदार नवनीत राणा यांना केलेल्या 'त्या' आवाहनानंतर आमरावतीचे आमदार रवी राणा नेमकं काय म्हणाले? बघा काय दिली प्रतिक्रिया

अमरावती, ३० ऑगस्ट २०२३ | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार नवनीत राणा यांना भाजपच्या कमळावर निवडणूक लढण्याची विनंती केली. बावनकुळे यांच्या विधानावर आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांनी दिली. रवी राणा म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांना मी धन्यवाद देतो भाजप नेते आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना वाटतं की नवनीत राणा यांनी भाजपवर लढावं. आम्ही देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहे तर NDA चा आम्ही सुद्धा घटक आहे. देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवनीत राणा राणा आशीर्वाद देतील. इतकंच नाही तर आम्ही NDA चे घटक आहोत ते नवनीत राणा यांना पाठींबा देतील, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला. आम्ही आघाडी धर्माचं पालन केलं भाजपही आघाडी धर्माचं पालन करतील, असे म्हणत नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीत विजयी होतील असे वक्तव्य करत रवी राणा यांनी विश्वास व्यक्त केला.

Published on: Aug 30, 2023 05:53 PM