Ravindra Dhangekar : ‘निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन् चुकीचा कारभार….’, ‘दीनानाथ’मधील घटनेनंतर गंभीर आरोप करत धंगेकरांची मोठी मागणी
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात घडलेल्या प्रकारासंदर्भातील एक अहवाल राज्य महिला आयोगासमोर सादर कऱण्यात आला. त्यामध्ये साडेपाच तास रूग्ण वेटिंगवर होता त्याच्यावर प्राथमिक उपचारदेखील करण्यात आले नाही, त्यामुळे त्या रूग्णाच्या मृत्यूला हे रूग्णालय जबाबदार असल्याचे म्हटलं जातंय.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात गेल्या दोन दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने रूग्णालय प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर गर्भवती महिलेच्या कुटुंबियांकडून रूग्णालयावर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली जात आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात घडलेल्या घटनेवर भाष्य केले. ‘दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचं ऑडिट करा आणि प्रशासक नेमा’, अशा मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. यासह दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील यूनिट भाड्यानं दिली आहे, असा गंभीर आरोप देखील धंगेकर यांनी केला आहे. तर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने महारालिकेचे कोट्यवधी रूपये थकवले असं म्हणत दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात अंगावरील कपडे आणि सोने पाहून प्रवेश दिला जातो, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. बघा काय म्हणाले रवींद्र धंगेकर?

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू

पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
