भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी, पाकिस्तानचे नागरिकही म्हणताय वाह… इंडिया!
VIDEO | चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंगनं रचला इतिहास... इस्त्रोच्या या यशस्वी कामगिरीमुळे इस्त्रोच्या संपूर्ण टीमचं देशभरातून कौतुक अन् पाकिस्तानही म्हणतोय वाह इंडिया
मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ | भारताने चांद्रयान ३ ची मोहीम यशस्वीरित्या फत्ते केली. या यशानंतर भारतामध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंग होणं ही देशातील प्रत्येकासाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. चांद्रयान ३ ची मोहीम यशस्वी झाली. भारतानं आपली छाप जगात उमटवली. इस्त्रोच्या शानदार कामगिरीमुळे चंद्रावर पाऊल ठेवलं आहे आणि दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. इस्त्रोच्या या यशस्वी कामगिरीमुळे इस्त्रोच्या संपूर्ण टीमचं देशभरातून कौतुक केले जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. मात्र भारताचा शेजारील देश पाकिस्तानही भारताच्या चांद्रयान ३ या मोहीमेचं कौतुक करताना दिसतोय. भारतावर कौतुकाचा वर्षाव करताना पाकिस्तानच्या नागरिकांनी त्यांच्याच देशाला मात्र चांगलच खडसावलंय आणि म्हणताय वाह…इंडिया…