घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा, रेडी रेकनरच्या दराबाबत मोठा निर्णय
VIDEO | रेडी रेकनरच्या दराबाबत मोठा निर्णय, घर खरेदी करणाऱ्यांना राज्य सरकारकडून कोणता दिलासा?
मुंबई : घर खरेदी करणाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रेडी रेकनरच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना महामारीतून सावरून आर्थिक घडी रुळावर आल्याने आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन रेडी रेकनरच्या वार्षिक मूल्यदरात काही बदल न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, कोरोना महामारीमुळे 1 एप्रिल 2020 ऐवजी सप्टेंबर 2020 मध्ये रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या वर्षी 2021-2022 या आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे दर जैसे थे ठेवण्यात आले होते. दरम्यान कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने गेल्या वर्षी राज्यात रेडी रेकनर दरात मोठी वाढ करत राज्य सरकारने नागरिकांना मोठा धक्का दिला होता, मात्र येणाऱ्या आगामी निवडणुका विचारात घेऊन राज्य सरकारने रेडीरेकनरच्या दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा

'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी

मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले

पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
