कोल्हापूर, कागलसह राज्यातील तणावात हसन मुश्रीफ यांची लोकांना साद; हातात विना घेत जोडले हात
कोल्हापूरात दंगलीसारखी परिस्थिती उद्भवली होती. त्याचदरम्यान आता पुन्हा एकदा कोल्हापूरच्या शेजारीच असणाऱ्या शहरातही वाद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमध्येच जातीय तेढ निर्माण झाले.
कोल्हापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यात धार्मिक सलोखा बिघडला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, बीड, नवी मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये तावातरण चिघळले. कुठे तणाव निर्माण झाला. तर कोल्हापूरात दंगलीसारखी परिस्थिती उद्भवली होती. त्याचदरम्यान आता पुन्हा एकदा कोल्हापूरच्या शेजारीच असणाऱ्या शहरातही वाद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमध्येच जातीय तेढ निर्माण झाले. पोलीसांच्यामुळे सध्या तेथे शांतता नांदत आहे. याचदरम्यान मुश्रीफ यांनी हातात विना घेऊन शांततेचा अनोखा संदेश दिला. हणबर समाजाच्या लक्ष्मी मंदिराचं कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने आमदार हसन मुश्रीफ यांनी हातात विना घेतला. त्यावेळी त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं. तसेच निवडणुका जवळ आल्या की धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न केले जातात असेही ते म्हणाले.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

