शिक्षणासाठी कायपण ! नदीत पूल नसल्याने तारेवरची कसरत, पुण्यातील विद्यार्थ्यांचा बघा जीवघेणा प्रवास
VIDEO | नदीवर पूल नसल्याने शाळकरी मुला-मुलींचा गुडघाभर पाण्यातून धोकादायकरित्या प्रवास, कुठलं आहे भीषण वास्तव? गरोदर स्त्रियांना, वयस्कर गृहस्थ, लहान मुलांना रस्ता, पुल आणि कुठल्याही प्रकारची सोय नसल्याने नागरिक चिंतेत
पुणे, ४ ऑगस्ट २०२३ | पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या घिसर ते हिरवेवस्ती दरम्यान कानंदी नदीवर पूल नसल्याने याठिकाणच्या, शाळकरी मुलांना गुडघाभर पाण्यातून धोकादायकरित्या प्रवास करून शाळेत जावे लागत आहे. अनेकदा पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यावर पाण्याचा प्रवाह तीव्र असतो. त्यामुळे अनेक दिवस विद्यार्थ्यांना घरीच बसाव लागतं आहे. शाळेत येण्या-जाण्यासाठी ग्रामस्थांना दररोज विद्यार्थ्यांना अंगा खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागते आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना पावसात दोन ते तीन किलोमीटर अंतर डोंगरदऱ्यातून, चिखल, काट्यातून वाट काढत जीव धोक्यात घालून प्रवास करत शाळेत पोहचाव लागतंय. त्यामुळे नदीवर पूल बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी शासनाकडे केलीय. मात्र गेली अनेक वर्ष शासन याकडे दुर्लक्ष करतंय. गरोदर स्त्रियांना, वयस्कर गृहस्थ, लहान मुलांना रस्ता, पुल आणि कुठल्याही प्रकारची सोय नसल्यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे तात्काळ याठिकाणी पूल बांधावा अशी मागणी आता जोर धरत आहे.