मराठ्यांना नव्या प्रवर्गातून आरक्षण? काय सांगतो कायदा? पाहा TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

मराठ्यांना नव्या प्रवर्गातून आरक्षण? काय सांगतो कायदा? पाहा TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Sep 12, 2023 | 9:57 PM

महाराष्ट्रात फक्त मराठा आरक्षणाचाच प्रश्न नाही. तर धनगर आरक्षणाचाही मुद्दा चर्चेला आला आहे. त्याची झलक धनगर बांधवाने मंत्री विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळून दाखवली आहे. विदर्भातील हलबा समाजाच्या आरक्षणाचाही मुद्दा अद्याप सरकारने सोडवलेला नाही...

मुंबई : 12 सप्टेंबर 2023 | मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात सरकारला यश आले. परंतु, आता मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचे आव्हान सरकारसमोर असणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणताहेत. मग, वेगळ्या प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळेल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सह्यादी अतिथिगृह येथे झालेल्या 2 तासांच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी काही आश्वासने दिली. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे, असा ठराव सर्वपक्षीय नेत्यांनी केला. लाठीचार्जच्या दिवशी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार. तसेच, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीला एका महिन्याचा वेळ द्यावा, अशीही विनंती सरकारने केली. आता मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सरकारने घेतली. मग मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी नेमका पर्याय काय आहे? पाहा TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Published on: Sep 12, 2023 09:57 PM