पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाला निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचं चॅलेंज, बघा काय म्हणाले…
VIDEO | हिंगोलीतील पाण्यावर तंरगणाऱ्या हरी महाराजांना बुलढाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचं चॅलेंज, म्हणाले पाण्यावर तरंगने हे केवळ
बुलढाणा : हिंगोलीत हरीभाऊ राठोड महाराज सावंगीकर यांचा पाण्यावर तरंगतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने ही कला अवगत केली त्याचे कारण ऐकून त्यांना दैवी शक्ती प्राप्त असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत, मात्र हे थोतांड असून या महाराजांना बुलढाण्यातील निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने चॅलेंज केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील प्रल्हाद तायडे हे पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी 2001 सालापासून पोहण्याचा सराव सुरू केला, आणि आज रोजी ते दिवसभर पाण्यावर तरंगू शकतात, पाण्यावर तरंगत विविध योगासने देखील करतात, आणि हे सर्व करत असताना ही कुठलीही विद्या नाही, उपवास केल्याने हे शक्य होत नाही. केवळ सराव, मेहनत आणि पोहण्याचा एक भाग असल्याचं प्रल्हाद इंगळे सांगतात. त्याचबरोबर त्यांनी हरी महाराजांना आपल्यासोबत पोहण्याचे चॅलेंज देखील केले आहे.