काँग्रेसचे अनेक नेते भाजपात येण्यासाठी उत्सुक, या नेत्यानं केला गैप्यस्फोट अन् म्हणाले…

| Updated on: Feb 19, 2023 | 6:29 PM

VIDEO | काँग्रेस दिशाहिन आणि फरफटत चाललेला पक्ष, काँग्रेसचे अनेक नेते आणि विधानसभा सदस्य भाजपात येण्यासाठी उत्सुक; कोणत्या नेत्यानं केलं भाष्य बघा व्हिडीओ

अहमदनगर : काँग्रेस दिशाहिन आणि फरफटत चाललेला पक्ष आहे. नाशिक पदवीधरमध्ये जी अवस्था झाली आहे, तशीच अवस्था राज्यभरात काँग्रेसची आहे. काँग्रेसचे अनेक नेते आणि विधानसभा सदस्य भाजपात येण्यासाठी उत्सुक असल्याचा मोठा गौप्यस्फोट महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील केला आहे. अहमदनगर येथील लोणी गावात शिवजयंती सोहळ्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल करण्यात आले त्यावरही भाष्य केले. अहमदनगरच्या लोणी गावात 34 वर्षांपासून एक गाव एक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी तेथील लेझीम पथक, सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या परेडने सर्वांच लक्ष वेधले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची सपत्नीक आरती देखील केली.

Published on: Feb 19, 2023 06:29 PM
क्या बात है! तब्बल २३ हजार ८०० स्क्वेअर फुटाचं शिवरायांचं विश्वविक्रमी पेंटिंग पाहिलंत का?
कसबा निवडणुकीत उमेदवार नवा ट्विस्ट, काँग्रेसचा मोठा नाराज नेता प्रचारात उतरणार