किरीट सोमय्या यांची राऊत यांच्यावर जहरी टीका, म्हणाले, लव्ह जिहाद...

किरीट सोमय्या यांची राऊत यांच्यावर जहरी टीका, म्हणाले, लव्ह जिहाद…

| Updated on: May 18, 2023 | 1:34 PM

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या पलटवार करताना राऊत आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. बाळासाहेब ठाकरे हे भगवाधारी होते.

मुंबई : राजकीय अस्थिरता आणून पुन्हा एकदा निवडणूकींना सामोरे जायचं, तणाव निर्माण करायचा, दंगली घडवायच्या आणि तणावांवर मत मागायची, हाच धंदा भाजपचा असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या पलटवार करताना राऊत आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. बाळासाहेब ठाकरे हे भगवाधारी होते. त्यांनी शिवसेनेला भगवा रंग दिला. मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी हिरवा रंग अंगिकारला असे म्हटलं आहे. तर संजय राऊत लव्ह जिहादचा प्रचार करत आहेत. हेच स्वाभाविक असल्याचा टोली देखिल सोमय्या यांनी लगावला. तर ठाकरेंनी जो भष्ट्राचार केला होता, तो महाराष्ट्र भष्ट्राचारमुक्त करायचा आहे असेही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Published on: May 18, 2023 01:34 PM