Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime | जुन्नरच्या अनंत पतसंस्थेत दरोडा, दरोडेखोरांकडून मॅनेजरवर गोळीबार

Pune Crime | जुन्नरच्या अनंत पतसंस्थेत दरोडा, दरोडेखोरांकडून मॅनेजरवर गोळीबार

| Updated on: Nov 24, 2021 | 5:25 PM

पुण्यातील जुन्नर तालुक्यातील कांदळी गावात दिवसा ढवळ्या सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कांदळी अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी जवळपास अडीच लाखांची रक्कम लंपास केली आहे.

पुण्यातील जुन्नर तालुक्यातील कांदळी गावात दिवसा ढवळ्या सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कांदळी अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी जवळपास अडीच लाखांची रक्कम लंपास केली आहे. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात पतसंस्थेतील व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबात मिळालेली माहिती अशी की आज (बुधवारी) दुपारी दीड वाजण्याचा सुमारास व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर व लिपिक अंकिता नेहरकर जेवण करत होते. त्याच दरम्यान पतसंस्थेत हेल्मेट घालेले दोन अज्ञात व्यक्ती आले. त्या दोघांनी व्यवस्थापक भोर यांच्याकडे थेट पैश्यांची मागणी केली. मात्र भोर यांनी नकार दिली. त्यानंतर त्यांनी थेट भोर यांच्यावर गोळीबार केला. अन जवळपास अडीच लाखांची रक्कम घेऊन दोघेही पसार झाले. पतसंस्थेतील सीसीटीव्हीमध्ये दोन्ही दरोडेखोर कैद झाले आहेत.