महिलेकडे काय आहे की तिला 1 कोटी द्यायची वेळ आली? विरोधकांची जयकुमार गोरेंवर टीका
जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी आज 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना पकडलं आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी महिलेने 3 कोटी रुपये मागितल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी प्रकरणात पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप महिलेवर करण्यात आला. तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी महिलेला अटक केली.
दरम्यान, या घटनेनंतर आता विरोधकांनी गोरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. या महिलेकडे नेमकं काय होतं की तिला 1 कोटी द्यावे लागले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जयकुमार गोरे आणि या महिलेत करार झालेला होता. कोर्टातून ते बाहेर कसे पडले? या महिलेला कोणी त्रास देणार नाही असा करार झालेला होता. हा करार करण्याचं कारण काय? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास व्हायला हवा. 3 कोटी हा मोठा आकडा आहे. त्यात 1 कोटी दिले कशासाठी? या महिलेकडे असं काय आहे की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला? अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तर खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणी जयकुमार गोरे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर

