“शिवराय, आंबेडकर, तुकाराम महाराज यांच्याबद्दल बोललं गेलं तेव्हा तुम्ही शांत का होता?”
Rohit Pawar : भाजपने सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली आहे. त्यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : स्वातंत्र्यवीस सावरकर यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असं म्हणत भाजपने सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे गरिबांची घरं जळणारे आहेत. तर श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणार आहेत. सावरकर यात्रा काढतायेत, हे चांगलं आहे. पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, तुकाराम महाराज यांच्याबद्दल बोललं गेलं तेव्हा तुम्ही शांत का होता?, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. राजकीय फायदा नसेल म्हणून तुम्ही बाजू घेतली नाही का? साध्या भाषेत सांगायचं तर या घटना घडत असताना तुम्ही शांत बसलात?, असा सवालही रोहित पवार यांनी विचारला आहे.
Published on: Mar 30, 2023 02:51 PM
Latest Videos