बसचा छप्पर उडालेला व्हिडीओ व्हायरल, त्यादिवशी काय घडलं? बस चालकाने सांगितला घटनाक्रम…
गडचिरोली जिल्ह्यातल्या एसटी बसेसची दुरवस्था दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एसटी बस धावताना छप्पर उडाले. ही घटना कशी घडली यासंबंधित माहिती बस चालक प्रदीप मेश्राम यांनी टीव्ही 9 मराठी चॅनलला दिली.
गडचिरोली, 28 जुलै 2023 | गडचिरोली जिल्ह्यातल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची दुरवस्था दाखवणारा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एसटी बस धावताना चक्क छप्पर उडाले आहे.या बसमध्ये दहा प्रवासी होते आणि पावसाचे पाणी आत येत असल्याने प्रवाशांनी आणि चालकाने छत्री घेऊन जवळपास 50 किलोमीटर ही बस चालविल्याचे चालक प्रदीप मेश्राम यांनी टीव्ही 9 मराठी चॅनलला माहिती दिली. दोन वर्षापासून या बसची दुरावस्था दिसत होती आणि अनेकदा तक्रार केल्यानंतर कोणतीही दुरूस्ती या बसची करण्यात आली नसल्याचा आरोप चालकाने केला. अखेर या प्रकरणाची दखल महामंडळाने घेतली आहे. संबधीत विभागाचे यंत्र अभियंता शि.रा.बिराजदार यांना महामंडळाने निलंबित केले आहे.
Published on: Jul 28, 2023 07:35 AM
Latest Videos