राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
VIDEO | राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रामदास आठवले यांनी नेमकी काय मागणी?
मुंबई : वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आर पी आय आठवले गटाचा वसईत कार्यकर्ता मेळावा काल संपन्न झाला आहे. आर पी आय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष ईश्वल धुळे यांच्या नेतृत्वाखाली वसई माणिकपूर येथील वाय एम सी सभागृहात, राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला आहे. दरम्यान, येत्या वसई विरार महापालिका निवडणुकीत भाजपाच्या मदतीने आम्हीही आमचे उमेदवार उभे करणार असा विश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला एक मंत्रिपद मिळाले पाहिजे अशी मागणी ही रामदास आठवले यांनी वसईत केली आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी भाजपकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी मोठी मागणी केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षाला 3 जागा हव्या आहेत. तर विधानसभेसाठी रामदार आठवले यांनी 15 जागा मागितल्या होत्या.