Rupali Chakankar : पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, ‘भिसे कुटुंबाला मानसिक त्रास अन्…’, रूपाली चाकणकरांकडून थेट निर्देश
आयोगाने मंगेशकर रूग्णालयातील मृत्यू प्रकरणी पोलीस आयुक्त, पुणे आणि अध्यक्ष,महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांना यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश रूपाली चाकणकर यांनी दिले असून आयोगास केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्यास सांगितले आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक करा, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटलंय. तर वैयक्तिक माहिती परवानगीविना सार्वजिक केल्याने मानसिक त्रास झाला असल्याची तक्रार सविता भिसे यांनी महिला आयोगाकडे दाखल केली असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली. यासह घडलेल्या प्रकरणासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देखील रूपाली चाकणकर यांनी दिले असून कार्यवाहीचा चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्यासही त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात रूपाली चाकणकर यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले की, तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर केलेल्या अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला. मृत तनिषा आणि भिसे कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती परवानगीविना सार्वजनिक केल्याने मानसिक त्रास झाल्याची तक्रार सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे.

भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती

नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?

1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला

बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
