Jaykumar Gore : ‘मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही, माझं राजकारण संपलं तरी चालेल पण…’, जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
:"मी मंत्री झालोय हे पवारांना अजून मान्यच होईना" ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा शरद पवारांना टोला, "माझं राजकारण संपलं तरी चालेल पण मी पवारांच्या पुढे कधीच झुकणार नाही", असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय.
‘माझं राजकारण संपलं तरी चालेल पण शरद पवारांपुढे कधीच झुकणार नाही’, असं वक्तव्य करत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मी मंत्री झालोय हे शरद पवारांना अजूनही मान्यच झालं नसल्याचेही जयकुमार गोरे यांनी म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ‘हा सामान्य कुटुंबातला आहे. हा कसा आमदार होऊ शकतो. आमदार झालोय हे १० वर्षे त्यांनी मान्यच केले नाही. आता मंत्री झालो हे त्यांना मान्य होत नाहीये. आजपर्यंत सगळ्या नेत्यांनी त्यांच्यासोबत तडजोड केली असेल पण पश्चिम महाराष्ट्रातील मी एकमेक जो कधीही पवारांच्या पुढे झुकणार नाही.’, असा खरमरीत टोला ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवारांना लगावला. माझं राजकारण संपलं तरी चालेल बारातमतीच्या पुढे कधी झुकणार नाही, असं जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यातील आंधळी येथील एका कार्यक्रमातील सभेत म्हटलं. तर बारामतीच्या पुढे झुकलो असतो तर माझी आमदारकी सोपी झाली असती मात्र यामुळे आपल्या शेतात पाणी आलं नसतं मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती तर माण खटावला पाणी मिळालं नसतं, माझा विरोध बारामतीला आणि पवारांना अजिबात नाही मात्र ज्यांनी या तालुक्याला मातीला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांना माझा विरोधात आहे असं सुद्धा मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.

सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक

काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'

पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
