Saamana : …तर वाद राहतोच कुठे? राज ठाकरेंचा जन्म शिवसेनेच्या गर्भातून, ठाकरे बंधू एकत्र येण्यावर ‘सामना’नं काय म्हटलं?
राज ठाकरे यांनी त्यांची इच्छा व्यक्त करताच उद्धव ठाकरे ही मागे राहिले नाहीत. महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी त्यांनीही दमदारपणे एक पाऊल पुढे टाकलंय, असं म्हणत सामनातून राज ठाकरेंच्या भूमिकेवर सकारात्मक भाष्य करण्यात आलंय.
राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार अशा चर्चा सुरू असल्याचे दिसतंय. अशातच सामनामधून सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा वरून भाष्य करण्यात आलेलं आहे. ठाकरे बंधू हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्यास तयार आहेत. खरंतर या बातमीने अनेकांना आनंद झाला तसे अनेक जण पोटदुखीने बेजार झाले. राज ठाकरेंचे आत्तापर्यंत राजकारण नागमोडी पद्धतीचे होते. ते फारसे यशस्वी झाले नाहीत. भाजप, एसीसी वगैरे लोक राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ले करीत राहिले. मोदी-शहा, फडणवीस देशाचे नाही तर महाराष्ट्राचे तरी कसे होतील? असा सवाल समानातून करण्यात आलाय. तर मराठी माणसाचा स्वाभिमान महाराष्ट्राच्या कल्याणपुढे मतभेद वगैरे शून्य आहे. महाराष्ट्रद्रोह्यांना घराच्या उंबरठ्या बाहेरच ठेवावं ही माफक अपेक्षा त्याच कुणी अट किंवा शर्त मानू नये. महाराष्ट्राच्या शत्रूंना घरात थारा देऊ नये. शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंचा सुद्धा जन्म झाला, असंही समानातून म्हटलंय.

पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल

दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी

गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त

खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
