उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाहीर सभा, उर्दू भाषेत केली बॅनरबाजी अन् राजकीय वर्तुळात चर्चा

उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाहीर सभा, उर्दू भाषेत केली बॅनरबाजी अन् राजकीय वर्तुळात चर्चा

| Updated on: Mar 25, 2023 | 5:07 PM

VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातील सभेआधी केलेली बॅनरबाजी चर्चेत, मुस्लिम बहुल भागातील बॅनरवर म्हंटलंय तरी काय?

नाशिक : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकीकडे राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं असताना उद्धव ठाकरे उद्या मालेगावमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला जास्तीत जास्त मुस्लीम बांधवांनी हजर राहवं यासाठी मालेगावच्या चौका-चौकात ठाकरे गटाकडून उर्दू भाषेत जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने यासभेला जास्तीत जास्त मुस्लीम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवं म्हणून विशेष प्रयोजन करण्यात येत असल्याचे मालेगावातील बहुल भागात पाहायला मिळत आहे. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा करीत आहे. त्यामध्ये नुकतीच खेडची सभा झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे मालेगावमध्ये सभा घेत आहे. यासाठी संजय राऊत हे दोन दिवसांपासून मालेगाव दौऱ्यावर आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकला येत आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यासह स्थानिक नेते जोरदार तयारी करीत आहे.

Published on: Mar 25, 2023 05:07 PM