शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हाकलपट्टी करावी, कुणी केली आक्रमक मागणी?
आमदार जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमात संविधाननिर्माता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन 80 टक्के लोकांवर अन्याय केला, असे वक्तव्य केले. यावर सचिन खरात यांनी भाष्य केले, म्हणाले.... 'जितेंद्र आव्हाड असं विधान करणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ऑडिट करणे इतपत देशात कोणच मोठं नाही आणि तुमची तर लायकीच नाही'
मुंबई, १७ जानेवारी २०२४ : आमदार जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमात संविधाननिर्माता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन 80 टक्के लोकांवर अन्याय केला, असे वक्तव्य केले. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड असं विधान करणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ऑडिट करणे इतपत देशात कोणच मोठं नाही आणि तुमची तर लायकीच नाही, संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये न्यायव्यवस्थेला स्वायत्त ठेवलेले आहे, यामुळे न्यायाधीशाला न्याय देताना जात, धर्म, लिंग, भाषा, वर्ण हा कोणताही विषय समोर येऊ नये म्हणूनच न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण नाही त्यामुळे जितेंद्र आव्हाड आपण जे संविधाननिर्माता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जे वक्तव्य केलं आहे या वक्तव्याची तात्काळ माफी मागावी, अशी विनंती सचिन खरात यांनी केली. पुढे ते असेही म्हणाले की, जितेंद्र आव्हाड तुमचे कार्यकर्ते आहे आणि राज्यात वादग्रस्त विधाने करत आहेत, जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.