शिवसैनिकांनो, ‘हे; एक काम करा अन् गद्दारांचा बदला घ्या; कुणाचं आव्हान?
कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंचे नेते सचिन खरात यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. पाहा ते काय म्हणालेत...
कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंचे नेते सचिन खरात यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. “भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेना या पक्षाचे नाव आणि त्यांचे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे असे समजते परंतु जे शिवसैनिक रयतेचे राजे शिवाजी महाराजांच्या विचाराला मानतात त्या शिवसैनिकांनी खचून जाऊ नये कारण तुमच्याबरोबर रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांना मानणारा वर्ग आहे. शिवसैनिकांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कसबा आणि चिंचवड या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक चालू आहे या पोटनिवडणुकीमध्ये या मतदारसंघातील महाविकासआघाडीचे दोन्हीही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि या गद्दारांचा बदला घ्या”, असं सचिन खरात म्हणाले आहेत.
Latest Videos