पवारांवर टीका करताना पडळकर अन् सदाभाऊ खोतांची जहरी टीका, मारकडवाडीतून थेट हल्लाबोल
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी हे गाव ईव्हीएमविरोधातील मोहिमेचे एक केंद्र बनलंय. मारकडवाडीतील ग्रामस्थांना बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्यास प्रशासनाने विरोध केलाय. त्यानंतर रविवारी शरद पवारांनी मारकडवाडीच्या ग्रामस्थांची भेट घेतली.
शरद पवार यांनी गेल्या रविवारी मारकडवाडीच्या ग्रामस्थांची भेट घेऊन तिथे सभा घेतली. त्यानंतर सभेला सभेनं उत्तर देण्यासाठी भाजपकडून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत आले आणि त्यांनी सभा घेतली. पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत दोघेही घसरलेत. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जहरी टीका करत १०० शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला, असे पडळकर म्हणाले आणि एकेरी उल्लेख करत हल्लाबोल केला. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी हे गाव ईव्हीएमविरोधातील मोहिमेचे एक केंद्र बनलंय. मारकडवाडीतील ग्रामस्थांना बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्यास प्रशासनाने विरोध केलाय. त्यानंतर रविवारी शरद पवारांनी मारकडवाडीच्या ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी सभेतून केलेल्या टीकेवर पडळकरांनी आता प्रत्युत्तर देत टोकाची भाषा वापरली आहे. काल गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हेलिकॉप्टरने मारकडवाडीत दाखल झालेत. त्यानंतर दोघांची बैलगाडीतून मिरवणूक निघाली. पण ज्या पद्धतीने शरद पवारांवर पडळकरांवर निशाणा साधला तशीच टीका सदाभाऊ खोतांनी केली. बघा काय म्हणाले गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत ?