Sadabhau Khot : ‘इंडियातील मोठा चोर, खळं लुटणारा…’, सदाभाऊ खोतांनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
राहुल गांधी गावात आल्यावर मारकडवाडीत दोन डबे मांडा, बॅलेट पेपरवर निवडून येऊ द्या. तो निवडून आला की त्याला पंतप्रधान करा, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राहुल गांधाी यांची मिमिक्री करत जोरदार निशाणा साधला.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी हे गाव गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. मारकडवाडीचा मुद्दा महाराष्ट्रासह आता दिल्लीपर्यंत गेल्याच्या चर्चा आहेत. याच मारकडवाडी गावात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते मंडळी भेट देत आहेत. नुकतीच शरद पवार यांनी या गावात सभा घेतली आणि ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. तर आज पहिल्यांदाच भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे मारकडवाडीत दाखल झालेत. या गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत पुन्हा बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याने हे ते काही शक्य झाले नाही. त्यानंतर राहुल गांधी या गावातून ईव्हीएमविरोधात रॅली काढणार आहेत. अशातच भाजप आणि महायुतीकडूनही आज या गावात सभा घेण्यात आली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी मारकडवाडी गाजवली. जाहीर सभेत बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांची मिमिक्री करत नाव न घेता जोरदार हल्लाबोल केलाय. बघा सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली

गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना

भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
