Sadabhau Khot On Uddhav Thackeray : सदाभाऊ खोतांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका

Sadabhau Khot On Uddhav Thackeray : सदाभाऊ खोतांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका

| Updated on: Apr 30, 2022 | 8:43 PM

मुख्यमंत्र्यांचं कडवं हिंदुत्व राहिलेलं नाही. मुख्यमंत्री आता हिरवा शालू पांघरलेल्यांच्या बरोबर त्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेला आहात, तुमचं हिंदुत्व नामोहरम झालेलं आहे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केलीय.

रत्नागिरी : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्दा राजकारणात ठिणग्या उडवत आहे. आधीच मनसेच्या औरंगाबादेतल्या सभेने (Raj Thackeray Aurangabad) राजकारणाचा पार चढवला असताना आता माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांनी थेट हिंदुत्वावरून शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना (Cm Uddhav Thackeray) फटकारलंय. शिवसेनेने जे कडवं हिंदुत्व धारण केलेलं होतं, ते मुख्यमंत्र्यांचं कडवं हिंदुत्व राहिलेलं नाही. मुख्यमंत्री आता हिरवा शालू पांघरलेल्यांच्या बरोबर त्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेला आहात, तुमचं हिंदुत्व नामोहरम झालेलं आहे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केलीय. त्यामुळे आता शिवसेना नेत्यांकडून यावर जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. गेल्या अडीच वर्षांपासून याच मुद्यावर शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे. भाजप नेतेही वारंवार हिंदुत्वावरून शिवसेनेला डिवचत आहे. शिवसेनाही विरोधकांवर त्याच आक्रमकतेने पलटवार करत आहे. मात्र सध्या राजकारणात एकच मुद्दा गाजतोय. तो म्हणजे हिंदूत्व (Hindutva).