‘नाहीतर शेतकऱ्यांना गांजा पिकवण्याची परवानगी द्या’, सदाभाऊ खोत यांचा सरकारला थेट इशारा
VIDEO | 'सरकारने एक धोरण ठरवावं की शेतकऱ्यांना शेती करायची का नाही करायची. जर सगळ्यांनाच शेतकऱ्याचा फुकट खायचा असेल तर शेतकऱ्याची शेती ताब्यात घ्यावी आणि....', सदाभाऊ खोत सरकारवर संतापले
सांगली, २१ ऑगस्ट २०२३ | केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क वाढवल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नाराजी आहे. आता कुठे शेतकऱ्याच्या लाल कांद्याला दर मिळत आहे. आणि सरकारने हा निर्णय केला. सरकारने एक धोरण ठरवावं की शेतकऱ्यांना शेती करायची का नाही करायची. जर सगळ्यांनाच शेतकऱ्याचा फुकट खायचा असेल तर शेतकऱ्याची शेती ताब्यात घ्यावी. आणि सरकारने प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला मंत्रालयात जसा क्लार्कला पगार असतो तसा पगार द्यावा. नसेल तर सरकारने शेतकऱ्याला गांजा पिकवण्याची परवानगी द्यावी. शेतकरी शेतीमाल पिकवणार नाहीत आणि या गांजा पिकवून ते आपला उदरनिर्वाह करतील. तसेच पुढच्या महिन्यात नाशिक मधून कांदा प्रश्न आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला. सरकारने विनंती करायची आहे की किमान शेतकऱ्याला काही देता येत नसेल तर देऊ नका मात्र त्याच्या अन्नामध्ये विष कालवू नका, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय.