धनुष्यबाण चिन्हानंतर आता मशाल चिन्ह ही जाणार? ‘या’ पक्षाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला निवेदन
VIDEO | ठाकरे गटाचं मशाल चिन्ह काढून घ्या; कोणत्या पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं निवेदन
ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी एक मोठा निर्णय दिला. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आलं. ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर त्यांना आता येणाऱ्या निवडणूकीत मशाल या चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे. मात्र, यानंतरही ठाकरे गटाच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाही. कारण, मशाल या चिन्हावर देखील समता पक्षाने दावा केल्यानं ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज समता पक्षाचं शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जात ठाकरे गटाचे मशाल हे निवडणूक चिन्ह काढून घ्यावं, असे निवेदन केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे . आता यावरही लवकर सुनावणी होणार असून धनुष्यबाण चिन्हानंतर मशाल ही चिन्ह जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत काय म्हणाले समता पक्षाचे नेते उदय मंडळ बघा व्हिडीओ…