तुम्ही चोर आहात, आमची मशाल तुम्ही चोरली; कुणी केला ठाकरे गटावर पलटवार?
VIDEO | मशाल चिन्ह मिळावं यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, मशाला चिन्हावर आता कुणाचा दावा; बघा व्हिडीओ
ठाणे : उद्धव ठाकरे गटाला आता मशाल चिन्ह मिळवण्यासाठी देखील झगडावं लागत असल्याचं दिसून येत आहे. समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा करत थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मशाल चिन्ह समता पार्टीचे आहे. ते आधीही होतं आणि आता इथून पुढे देखील राहील. हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाने चोरी केल्याचा आरोपही समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ यांनी केला आहे. तर मशाल चिन्ह आम्हाला मिळावं यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. ज्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले तीच खरी शिवसेना आहे आणि जे आता मशाल मशाल करतायात ती समता पार्टीचे मशाल आहे ती त्यांची नाही. ठाकरे गटाकडून वारंवार सांगितलं जातंय धनुष्यबाण चोरीला गेला. प्रत्यक्षात ज्यांची क्षमता होती त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालं. उलट उद्धव ठाकरे गट चोर आहे त्यांनी आमचं मशाल चिन्ह चोरी केलं असल्याचेही समता पार्टीने म्हटले आहे.