Sambhaji Bhide : ‘…हेच सत्य अन् संभाजीराजे बोलले ते 100 टक्के चूक’, रायगडावरील वाघ्या कुत्र्यासंदर्भात भिडे गुरूजींचं मोठं वक्तव्य
रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरून संभाजी राजे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी देखील त्यांनी काही फोटो, पुरावे दाखवत वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत पुन्हा एकदा भाष्य केले यानंतर संभाजी भिडे गुरूजींनीही प्रतिक्रिया दिली आहे.
माजी खासदार संभाजी राजे यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी किल्ले रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली. दरम्यान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग हे प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठी कसा होईल, हे बघतोय त्यामुळे सगळा चोथा झाला आहे, असं संभाजी भिडे म्हणाले. यावेळी किल्ले रायगडवर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावर भाष्य करत संभाजी भिडे गुरुजी यांनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला समर्थन दिल्याचे पाहायला मिळाले. पुढे ते असेही म्हणाले, संभाजीराजे भोसले बोलतात ते 100 टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलेली कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे. त्यामुळे स्मारक करण्यात आले आहे. माणसे जेवढी एकनिष्ठ नसतात, तेवढी कुत्री असतात. निदान आताच्या युगात देशाशी असे एकनिष्ठ राहायचे आहे, त्याचे प्रतिक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक किल्ले रायगडावर राहिले पाहिजे. स्वार्थासाठी कशीही मते बदलणाऱ्या माणसांना माझे मत पटणार नाही, असे भिडे गुरुजी यांनी सांगितले.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
