शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेतात आणि जातात कुठे, संभाजीराजे संतापले
कालपर्यंत 50 खोके एकदम ओके म्हणणारे अजित पवार आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार निधी देत नाही म्हणून बंड करणारे शिंदेंचे आमदार देखील अजित पवार यांच्या मांडिला माडी लावून सत्तेत बसले आहेत. राज्यातल्या या घडामोडींवर स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे.
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोण कधी कोणासोबत जाईल याचा नेम नाहीय. कालपर्यंत 50 खोके एकदम ओके म्हणणारे अजित पवार आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार निधी देत नाही म्हणून बंड करणारे शिंदेंचे आमदार देखील अजित पवार यांच्या मांडिला माडी लावून सत्तेत बसले आहेत. राज्यातल्या या घडामोडींवर स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे. “मी आता कन्फ्यूज झालोय की, हे 9 मंत्री विकासाच्या नावाने ओरडायचे.. शाहू, फुले, आंबडेकर यांचे नाव घेतात आणि जातात कुठे? राज्यात विरोधीपक्ष आहे की नाही ? आपण म्हणतो जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र निर्माण करायचा. पण असा महाराष्ट्र आपल्याला हवा आहे का? असा महाराष्ट्र आपल्याला हवा आहे का? शिवसेना सत्तेत पण आहे आणि विरोधात पण आहे. राष्ट्रवादी सत्तेत पण आहे आणि विरोधात पण आहे. तुम्हाला हे राजकारण पटतंय का?” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

