सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादीच आमने-सामने; बार्शी विधानसभेवरून संभाजीराजे यांचं मोठं वक्तव्य!

सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादीच आमने-सामने; बार्शी विधानसभेवरून संभाजीराजे यांचं मोठं वक्तव्य!

| Updated on: Jul 17, 2023 | 10:23 AM

शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीमुळे राज्याच्या राजकारणाचं समीकरण बदललं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे राज्यात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापूर, 17 जुलै 2023 | शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीमुळे राज्याच्या राजकारणाचं समीकरण बदललं आहे. एकनाश शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे दोन गट पडले. तर अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही पक्षांचा एक गट सत्तेत तर एक गट विरोधात आहे. त्यामुळे राज्याच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “सत्तेत शिवसेना, विरोधातही शिवसेना. सत्तेत राष्ट्रवादी, विरोधातही राष्ट्रवादी आणि भाजप मजा बघत उभी राहिली. साडेतीन वर्षात सर्वच पक्ष सत्तेत येऊन गेलेत. हे चालचतं का तुम्हाला? तुम्ही जर आमच्यासोबत आहात तर आम्ही बार्शी विधानसभा निवडून येऊ.”

Published on: Jul 17, 2023 10:23 AM