Special Report | क्रांती रेडकरची उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रवादीची तक्रार?

Special Report | क्रांती रेडकरची उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रवादीची तक्रार?

| Updated on: Oct 28, 2021 | 9:17 PM

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर अभिनेत्री क्रांती रेडकरने शिवसेनेकडे धाव घेतली आहे. क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहित राष्ट्रवादीची अप्रत्यक्षपणे तक्रार केली आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर अभिनेत्री क्रांती रेडकरने शिवसेनेकडे धाव घेतली आहे. क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहित राष्ट्रवादी काँग्रेसची अप्रत्यक्षपणे तक्रार केली आहे. “आमचा काहीही संबंध नसताना रोज़ सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चार चौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आज ते नाही पण तुम्ही आहात. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती”, असं क्रांती रेडकर पत्रात म्हणाली आहे.