MNS : मनसेच्या संदीप देशपांडेंचं आशिष शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, नेमकं कारण काय?
मुंबई महापालिकेच्या समोरील पत्रकार भवन येथे येत्या 26 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता मनसेचे पहिले प्रतिसभागृह भरणार आहे. त्यामध्ये, मुंबईतील रस्ते, आरोग्य, आणि आपत्कालीन व्यवस्थापन अशा प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मनसेकडून राज ठाकरेंच्या नेतृत्वात राज्याच्या कारभारावर लक्ष राहण्यासाठी शाडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली होती. मात्र, मनसेचा हा पॅटर्न फेल ठरल्यानंतर आता मुंबईत मनसेकडून प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे. येत्या 26 एप्रिल रोजी मनसेकडून प्रतिपालिका सभागृहाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, सध्या प्रशासनाच्या वतीने मुंबई महानगरपालिकेचा कारभार चालवला जतोय. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईतील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांना सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन देखील केले आहे. मुंबई महापालिकेच्या प्रतिपालिका सभागृहात उपस्थित राहण्यासाठी मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार त्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांना देखील पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले आहे.

पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर

बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन

महाराष्ट्रात कुठे-कुठे होणार उद्या मॉकड्रिल? बघा तुमचा जिल्हा आहे का?

भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन
