सांगलीतील विटा शहर आज बंद, काय कारण? वाचा…
लव्ह जिहादच्या विरोधात आणि याबाबत कायदा लागू करावा, गो हत्या बंदी, धर्मांतर यासह विविध मागण्यासाठी विटा शहरात आज बंद ठेवण्यात आलं आहे. पाहा...
लव्ह जिहादच्या विरोधात आणि याबाबत कायदा लागू करावा आणि गो हत्या बंदी, धर्मांतर यासह विविध मागण्यासाठी विटा शहरात आज बंद ठेवण्यात आलं आहे. या मुद्द्यांवर हिंदू गर्जना महामोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी विटा शहरातील व्यापारी विटा शहर बंद ठेवून मोर्चात सहभागी होणार आहेत. विटामधील नाथ मंदिर इथून हिंदू गर्जना मोर्चाची सुरुवात होणार आहे. या मोर्चासाठी विट्यातील आणि खानापूर तालुक्यातील ज्या सर्व संघटना आहेत या संघटनेने देखील पाठिंबा दिलेला आहे.
Latest Videos