बाबासाहेब आंबेडकर कमानीसाठी अजित पवार यांच्याशी चर्चा करणार अन्… सचिन खरात यांनी काय दिली ग्वाही?
VIDEO | येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी समाजाचा प्रश्न सोडवण्याचा प्रशासनाने लवकरच विचार करावा, अन्यथा..., आरपीआय खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी काय दिला इशारा? बघा व्हिडीओ
सांगली, १६ सप्टेंबर २०२३ | बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीसाठी लॉन्ग मार्च काढण्यात आला असून सुरू असलेल्या लॉन्ग मार्चमध्ये आज वाळवा तालुक्यातील विठ्ठल वाडी येथे आरपीआय खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी सहभाग घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी समाजाचा प्रश्न न सुटल्यास स्वतः आरपीआय खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनचे खरात यांनी लॉन्ग मार्चमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तातडीने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आंबेडकरी समाजाचा प्रश्न सोडवण्याचा प्रशासनाने लवकरच विचार करावा, अन्यथा आंबेडकरी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
त्यामुळे प्रश्न सोडवावा असे विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी सचिन खरात विठ्ठलवाडी येथे लॉन्ग मार्चमध्ये सहभाग घेऊन खरात पक्षाच्या पाठिंबा असल्याचा त्यांनी जाहीर केला आहे. तर खरात पक्षाच्या कार्यकर्त्यांना लॉन्ग मार्चमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.