सांगलीच्या कडेगावमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मोहरम, गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा
VIDEO | सांगलीच्या कडेगावमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मोहरम, गगनचुंबी ताबूत भेटीचा अनोखा अभूतपूर्व सोहळा, बघा व्हिडीओ
सांगली, ३० जुलै २०२३ | सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कडेगाव येथील मोहरम मोठ्या उत्साहात आज संपन्न झाला आहे. यानिमित्ताने अभूतपूर्व गगनचुंबी ताबूत भेटींचा अनोखा सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी कडेगावमध्ये उपस्थिती लावली होती. सांगली जिल्ह्यातील कडेगाव शहर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते.
याठिकाणी पार पाडणारा मोहरम सण हा त्याचे प्रतीक आहे. गेली १५० वर्षांपासून कडेगावमध्ये गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा पार पडतो. विशेष म्हणजे गावातील बारा बलुतेदार एकत्र येऊन हा सण साजरा करतात. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दीडशे ते दोनशे फुट असणारे गगनचुंबी ताबूत अर्थात डोले. हे ताबूत बांधण्याचे काम सर्व समाजातील लोकांच्या माध्यमातून करण्याची प्रथा आहे. मुस्लिम धर्मीयांच्या बकरी ईद नंतर या ताबूत बांधणीच्या कामाला सुरवात होते. विशेष म्हणजे या दीडशे फुटी उंच बांधण्यात येणाऱ्या ताबूतमध्ये कोठेही गाठ मारण्यात येत नाही.