महाराष्ट्राचं राजकारण बदलणार? ठाकरे आणि शिंदे यांच्यात फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीत फूट पडणार?

महाराष्ट्राचं राजकारण बदलणार? ठाकरे आणि शिंदे यांच्यात फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीत फूट पडणार?

| Updated on: Apr 21, 2023 | 7:04 AM

VIDEO | अजित पवार भाजपमध्ये जाणार? अशी राज्यभरात चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांचा फोटो असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा, कुठं केली पोस्टरबाजी?

जळगाव : जळगावच्या धरणगाव बाजार समितीची निवडणूक होणार असून या निवडणुकीच्या पोस्टरवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा फोटो पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत शिवसेना भाजप पॅनलसोबत राष्ट्रवादीच्या संजय पवार यांचा गट आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची ताकद ही जळगाव जिल्ह्याच्या नेत्यांमध्ये असल्याचे म्हटले जात असून जिल्ह्यात ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये फूट पडली असून आता जळगावात राष्ट्रवादीमध्येही फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना-भाजप आणि संजय पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या सहकार पॅनलच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांचा फोटो एकत्र असल्याने राज्यात एकच चर्चा सुरू आहे. तर संजय पवारांच्या राष्ट्रवादीची गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली असताना निवडणुकीत महाविकास आघाडी गटाची चिंता वाढल्याचे म्हटले जात आहे.

Published on: Apr 21, 2023 07:00 AM