चंद्रकांत खैर यांच्या ‘त्या’ आरोपावर संजय राठोड यांचं प्रत्युत्तर, बघा काय म्हणाले?
VIDEO | 'तर लाखो लोक माझ्या पाठीशी उभे राहतात हीच माझ्या कामाची पावती', चंद्रकांत खैर यांच्या टीकेवर संजय राठोड यांनी प्रत्युत्तर देताना व्यक्त केला विश्वास
वाशिम : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काल वाशिममध्ये शिवगर्जना अभियानांतर्गत पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केला होता. दरम्यान, चंद्रकांत खैरे यांच्या आरोपाला संजय राठोड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले, ‘राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. माझी सुरुवात एक शिवसैनिक म्हणून झालेली आहे. मी अकरा वर्ष शिवसेनेच्या वेगवेगळ्या पदावर होतो. माझं सातत्याने मताधिक्य वाढत चाललेला आहे. जनता माझ्या पाठीशी आहे.’, असे त्यांनी म्हटले आहे. तर टीकाकारांवर निशाणा साधताना ते म्हणाले, आरोप करणारा काही आरोप करू शकतो. ते आरोप करत असतील तर मी आरोप करणार नाही. मी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी काम करत राहील जनता माझ्या पाठीशी आहे . मी जर हाक दिली तर लाखो लोक माझ्या पाठीशी उभे राहतात हीच माझ्या कामाची पावती आहे, असे म्हणत त्यांनी विश्वास व्यक्त केला.