‘Chandrayaan-3 वर स्वार होऊन प्रचार केला तरी…’, सामनातून मोदी सरकारवर हल्लाबोल, Watch Video
VIDEO | '२०२४ असो की २०२३, निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठकलेला आहे, Chandrayaan-3 वर स्वार होऊन प्रचार केला तरी, पराभव अटळ...' सामना वृत्तपत्रातील अग्रलेखातून भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
मुंबई, ३० ऑगस्ट २०२३ | ‘2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे.’, असे म्हणत आजच्या सामनातून भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तर ‘चांद्रयान 3’ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे, असे म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘इंडिया’ आघाडीने देशाचे वातावरण ढवळून काढले आहे. जनता जागी झाली आहे व कोणत्याही भूलथापांना ती बळी पडणार नाही. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात त्याप्रमाणे भाजपने देशातील सर्व विमाने, हेलिकॉप्टर्स प्रचारासाठी बुक केली आहेत. आम्ही म्हणतो, त्यांना हवे ते करू द्या. त्यांनी ‘चांद्रयान 3’ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे. त्यांच्या कुंडलीतल्या ओढूनताणून आणलेल्या सत्तायोगाची हवा गेली आहे. त्यांना राजयोग नव्हताच. ओढून चोरून आणलेला सत्तायोग होता. तो आता संपल्यात जमा आहे.