“राजकीय फायद्यासाठी समान नागरी कायदा आणला जातोय”, संजय राऊत यांना मोदी सरकारवर घणाणात
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. समान नागरी कायद्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.
नवी दिल्ली, 26 जुलै 2023 | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. समान नागरी कायद्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. ते म्हणाले की, “मणिपूर विषय महत्वाचा आहे. उद्धव ठाकरे यांनी मणिपूर विषयावर चिंता व्यक्त केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य नाही, घटनेचं राज्य नाही. ते केंद्र सरकार कोणत्या तोंडाने समान नागरी कायदा आणणार? प्रत्येक राज्यात तुमची भूमिका वेगळी आहे. तुमच्या राजकारणानुसार सोयीची भूमिका आहे. तर समान नागरी कायदा तुमच्या राजकीय फायद्यासाठी कशासाठी आणत आहात? हे उद्धव ठाकरे यांनी योग्यरितीने मांडलं आहे.”
Published on: Jul 26, 2023 11:58 AM
Latest Videos