Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ICU मध्ये जाण्याची वेळ…, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Oct 13, 2023 | 5:00 PM

VIDEO | राहुल नार्वेकर हे खडेबोल सुनवण्याच्या योग्यतेचे. त्यांच्या ठेका आणि हेक्यामुळे महाराष्ट्राच्या छातडावर घटनाबाह्य सरकार बसलंय, जितकी वेळं आयसीयूमध्ये ठेवून वाचवायचं होतं, तितकं नार्वेकर यांनी वाचवलं आता त्यांना आयसीयूमध्ये जाण्याची वेळ, संजय राऊत यांची सडकून टीका

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे खडेबोल सुनवण्याच्या योग्यतेचे आहेत. भारताचं संविधान, कायदा, नियम त्यांनी ज्या गांभीर्यतेने घ्यायला हवेत मात्र ते घेत नाही. त्यांना वाटतं ते म्हणतील ते संविधान आणि ते म्हणतील तेच कायदा. प्रत्येक वेळी म्हणता दिरंगाई होणार नाही, योग्य वेळी निर्णय घेऊ. तुमचा योग्य वेळी निर्णय घेण्याचा ठेका आणि हेक्यामुळे महाराष्ट्राच्या छातडावर घटनाबाह्य सरकार बसलंय. दिल्लीच्या आदेशानं एक घटनाबाह्य सरकार वाचवायचंय, असे म्हणत संजय राऊत यांनी सडकून टीका केलीये. जितकी वेळं आयसीयूमध्ये ठेवून वाचवायचं होतं, तितकं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आयसीयूमध्ये जाण्याची वेळ येईल, असे म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय. आम्ही तुमचा मान राखतोय. पण यांना मान घ्यायचा नसेल तुम्हाला मान घेता येत नसेल. कारण हे दहा पक्ष फिरून बारा गावाचं पाणी पिऊन खुर्चीवर बसलेले लोकं असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Published on: Oct 13, 2023 05:00 PM
Sushma Andhare : ललित पाटीलवर ‘या’ भाजपच्या नेत्याचा वरदहस्त, थेट नाव घेत सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
Sharad Pawar : शिवतीर्थवरील राज ठाकरे अन् दादा भुसे यांच्या बैठकीवर शरद पवार म्हणाले, माझ्या ज्ञानात भर पडली