“…मग लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती होण्यापासून पंतप्रधान मोदींनी रोखलं का?”, संजय राऊत यांचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. मात्र काँग्रेसने त्यांना डावललं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला आहे.
नवी दिल्ली, 09 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. मात्र काँग्रेसने त्यांना डावललं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, “म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडला का? शरद पवारांविषयी एवढा आदर आहे, म्हणून पक्ष फोडला का? शरद पवार आणि काँग्रेसचं वेगळं राजकारण आहे. लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपती होण्यापासून पंतप्रधानांनी रोखलं किंवा त्यांना संन्यास घ्यायला लावला असं आम्ही म्हणतो का? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसे शरद पवार आणि काँग्रेस हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.”

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
