Sanjay Raut: राज्यपालांचं वक्तव्य झाकण्यासाठी आज ईडीची कारवाई करण्यात आली- विद्या चव्हाण
जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व कट कारस्थान रचल्याचे विद्या चव्हाण म्हणाल्या. संजय राऊत हे लढवय्ये असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रात सुडाचं राजकारण हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे, मात्र काल राज्यपालांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य झाकण्यासाठी आजच ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केला आहे. गुजराती आणि राजस्थानी लोकं मुंबईतून निघून गेली तर महाराष्ट्रात काहीच उरणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कौशारी यांनी केले होते. यानंतर सर्वच स्थरातून राज्यपालांवर टीकेचा वर्षाव होऊ लागला होता. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व कट कारस्थान रचल्याचे विद्या चव्हाण म्हणाल्या. संजय राऊत हे लढवय्ये असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असेही त्या म्हणाल्या. संजय राऊत यांच्या घरी पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आज सकाळी सात वाजता ईडीची धाड पडली असून त्यांच्या घरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.
Published on: Jul 31, 2022 01:35 PM
Latest Videos