नितेश राणे पाठोपाठ आता भाजपचा हा नेताही अडचणीत; राऊत यांनी दाखल केला मानहानीचा दावा

नितेश राणे पाठोपाठ आता भाजपचा हा नेताही अडचणीत; राऊत यांनी दाखल केला मानहानीचा दावा

| Updated on: Jun 13, 2023 | 11:23 AM

सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. उपनगरातील मुलुंड येथील न्यायालयासमोर दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी सोमय्या यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 500 (बदनामीची शिक्षा) अंतर्गत शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्याची दखल घेण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध अपमानास्पद ट्विट पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई न्यायालयात धाव घेतली. त्यांनी सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. उपनगरातील मुलुंड येथील न्यायालयासमोर दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी सोमय्या यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 500 (बदनामीची शिक्षा) अंतर्गत शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्याची दखल घेण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. दाखल केलेल्या या तक्रारीत सोमय्या यांनी 2022 पासून आपली बदनामी केल्याचं म्हटलं आहे. तर येत्या काही दिवसांत न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. याच्या दोन एक दिवस आधीच राऊत यांनी भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्याविरोधातही मानहानीचा खटला दाखल केला आहे.

Published on: Jun 13, 2023 11:23 AM