‘…आत्ता महाराष्ट्रातील राज्यपाल कुठे आहेत?’; संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका
भाजपवर विधेयकावरून जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाना साधला त्याचबरोबर राज्यपाल राज्यपाल रमेश बैस यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023 । ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज संसदेच्या अधिवेशनात भाग घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर विधेयकावरून जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाना साधला त्याचबरोबर राज्यपाल राज्यपाल रमेश बैस यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. यावेळी राऊत यांनी, विधेयकात फार मोठं शडयंत्र आहे. त्यात काळबेरं आहे. ज्या राज्यात आपली सत्ता नाही तेथे राज्यपालांच्या मदतीने सत्ता गाजवायचं काम भाजपकडून केलं जातं. मग दिल्ली असेल महाराष्ट्र असेल. मग आता राज्याचे राज्यपाल कुठे आहेत? मविआचं सरकार होतं तेंव्हा त्यांचे अस्तित्व होतं. आता राज्यपाल कुठे आहेत. राज्यात गुन्हे घडत आहेत. भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत आहेत. खून, हत्या दरोडे बलात्कार होत आहेत. दंगली होत आहेत. मात्र राज्यपाल यांचा पत्ता नाही आता ते कुठे आहेत असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.