VIDEO : Sanjay Raut | महाराष्ट्रात काय चालू आहे हे सर्वांना माहिती, झुकणार नाही : संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर ईडीची धाड पडली. पत्रा चाळ प्रकरणी ही धाड पडली होती. ईडीकडून राऊतांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात देखील घेतले आहे. आज त्यांना मेडिकल चेकअपसाठी जेजे रूग्णालयात नेण्यात आले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर ईडीची धाड पडली. पत्रा चाळ प्रकरणी ही धाड पडली होती. ईडीकडून राऊतांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात देखील घेतले आहे. आज त्यांना मेडिकल चेकअपसाठी जेजे रूग्णालयात नेण्यात आले आहे. यावेळी राऊत माध्यमांना बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात काय चालू आहे हे सर्वांना माहिती, झुकणार नाही असं राऊतांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. विक्रोळी येथील निवास स्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली. यानंतर ईडीच्या कार्यालयात सात तासांहून अधिक काळ चौकशी झाली.