‘Mehbuba Mufti कधीकाळी BJP ची मैत्रीण होती, त्याच वेळी काश्मिरी पंडितांवर हल्ले : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, दहशतवादी अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती या कधीकाळी भाजपच्या मैत्रीण होत्या. मेहबुबा यांच्या पार्टीचे चारित्र्य नेहमीच फुटीरतावादी, काश्मीरच्या समर्थनार्थ राहिले आहे. त्यानंतरही भाजपने त्यांच्याशी युती केली. सत्ता उपभोगली.
मुंबईः अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्यासोबत भाजपने (BJP) सत्ता उपभोगली. त्याच काळात काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या. भाजपनेच मेहबुबा मुफ्ती यांना बळ दिले आहे, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. ते मुंबईत बोलत होते. राऊत म्हणाले की, दहशतवादी अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती या कधीकाळी भाजपच्या मैत्रीण होत्या. मेहबुबा यांच्या पार्टीचे चारित्र्य नेहमीच फुटीरतावादी, काश्मीरच्या समर्थनार्थ राहिले आहे. त्यानंतरही भाजपने त्यांच्याशी युती केली. सत्ता उपभोगली. काश्मिरी पंडितांवर त्याच काळात हल्ले झाले. आता त्याच मेहबुबा मुफ्ती काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा करावी म्हणतातयत. या मेहबुबा मुफ्ती यांना भाजपनेच बळ दिले आहे. शिवसेनेने नेहमी या विचारधारेचा विरोध केला, अशी टोलेबाजी रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.