Video : एकनाथ शिंदे नॉट रिचेबल, संजय राऊत म्हणतात…
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पक्षातच बंड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहेत. शिंदे यांनी आपल्याच सर्वोच्च नेत्याच्या नेतृत्वाखालील सरकारला सुरुंग लावण्याचं काम केलं आहे. शिंदे यांच्या या बंडाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनीही गंभीर दखल घेतली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी […]
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पक्षातच बंड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहेत. शिंदे यांनी आपल्याच सर्वोच्च नेत्याच्या नेतृत्वाखालील सरकारला सुरुंग लावण्याचं काम केलं आहे. शिंदे यांच्या या बंडाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनीही गंभीर दखल घेतली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी स्वत: मीडियासमोर येऊन शिंदे यांच्या बंडावर भाष्य केलं आहे. यावेळी राऊत यांनी शिंदे यांना निष्ठावंत शिवसैनिक असल्याचं सांगत ते बंड करणार नाहीत, असं वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी त्यांनी बंड झाल्याची कबुलीही दिली. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसून येत आहे.
Published on: Jun 21, 2022 12:26 PM
Latest Videos