भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्याच विरोधात मोर्चा काढला का?; संजय राऊतांचा सवाल
विविध मुद्द्यांसाठी काल हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावर शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. पाहा काय म्हणालेत...
मुंबई : विविध मुद्द्यांसाठी काल हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावर शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. काल जो हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी मोर्चा काढण्यात आला. त्यात मोर्चेकरींनी म्हणजेच भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्याच विरोधात मोर्चा काढला होता का?, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण त्यांचंच सरकार आणि तेच मोर्चे काढत आहेत.आजही हिंदुत्वासाठी लोकांचा शिवसेनेवरच विश्वास आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
Latest Videos