मोदीजी, तुम्ही राणेंसारख्या खोटारड्या माणसाला मंत्रिमंडळात कसं काय ठेवता?; संजय राऊतांचा सवाल

मोदीजी, तुम्ही राणेंसारख्या खोटारड्या माणसाला मंत्रिमंडळात कसं काय ठेवता?; संजय राऊतांचा सवाल

| Updated on: Feb 04, 2023 | 11:03 AM

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केलीय. पाहा व्हीडिओ...

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केलीय. नारायण राणे काहीही तथ्यहीन बोलतात. कोणत्याही पुरव्यांविना ते बोलत असतात. असल्या खोटारड्या माणसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात कसं काय ठेवलंय?, असा मला प्रश्न पडतो, असं संजय राऊत म्हणालेत. ते माध्यमांशी बोलत होते. अपमानास्पद वक्तव्य केल्याने काल संजय राऊत यांनी राणेंना नोटीस पाठवली आहे. त्यावरही राऊतांनी भाष्य केलंय.

Published on: Feb 04, 2023 10:36 AM