Sanjay Raut यांचा दादा भुसे यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, ड्रग्ज माफियाकडून किती खोके मिळाले?

Sanjay Raut यांचा दादा भुसे यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, ड्रग्ज माफियाकडून किती खोके मिळाले?

| Updated on: Oct 11, 2023 | 5:43 PM

VIDEO | ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललीत पाटील याला शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचा सपोर्ट असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. यानंतर आता मंत्री दादा भुसे यांचा ललित पाटील प्रकरणातील संबंध काय? ड्रग्ज कारखान्यांशी संबध काय? असा सवाल करत संजय राऊत यांनी केलाय

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललीत पाटील याला शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचा सपोर्ट असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. यासह दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड तपासण्याचीही मागणी त्यांनी केली. यानंतर आता संजय राऊत यांनी दादा भुसेंवर सडकून टीका केली आहे. नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या आशिर्वादाशिवाय हा ड्रग्जचा कारखाना चालू शकत नाही. या पालकमंत्र्याला ड्रग्ज पैशातून मोठी आर्थिक मदत मिळत होती. मंत्री दादा भुसे यांचा ललित पाटील प्रकरणातील संबंध काय? ड्रग्ज कारखान्यांशी संबध काय? असा सवाल करत संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर हल्लाबोल केलाय. इतकेच नाही तर दादा भुसे यांना ड्रग्ज माफियाकडून किती खोके मिळाले, असा घणाघातही संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर केला आहे. तर दादा भुसे यांचे ड्रग्ज माफियाशी कनेक्शन काय? याची चौकशी करण्यात यावी, यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेला एक पत्र लिहिणार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Published on: Oct 11, 2023 05:43 PM